वाळूज महानगर, (सांजवार्ता ब्युरो) : रस्त्यात छेडणाऱ्या टवाळखोराकडे दुर्लक्ष करत शाळेत गेलेल्या एका दहावीच्या विद्यार्थीनीचा भर वर्गात विनयभंग केला. जाब विचारणाऱ्या मुख्याद्यापकालाही मारहाण केली. देत ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. २४) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतत्याला ताब्यात घेतले.
वाळूज पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात १५ वर्षीय एक शाळकरी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभी असताना अचानक तेथे आरोपी विलास अशोक चिडे हा आला व ऐ पिल्लू चलती क्या? असे म्हणत तिची छेड काढली. यावेळी विद्यार्थ्यांनीने त्यास विरोध करत दुर्लक्ष केले. इतक्यात बस आल्याने सदर विद्यार्थ्यांनी बसमध्ये बसून शाळेत गेली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा नराधम पुन्हा शाळेत येऊन वर्गासमोर तिच्या नावाने आवाज सुरूवात केली. आरडाओरडा करण्यास मुख्याद्यापकालाही मारहाण : वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील प्रकार यानंतर यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मध्यस्थी करत त्याला येथून निघून जाण्यास सांगितले. मात्र त्याने मुख्याध्यापकास सुद्धा शिवीगाळ करत त्यांनाही मारहाण केली.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विलासने त्यांच्यासोबतही बराच वाद घातला होता. दरम्यान पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास अशोक चिडे त्याच्याविरोधात पोक्सो, अॅट्रॉसिटीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची पाहणी
दरम्यान, घटनेची माहिती मिळतात वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांनाही भेट देऊन पाहणी केली आहे.










